विभागाबद्दल
विभागाबद्दल
Banner image Mobile Banner image

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

राज्यातील पाणी पुरवठा कार्यक्रमाचे योजनाबध्द रितीने नियोजन, जलद विकास व उचित संनियंत्रण करण्याच्या दृष्टीने औपचारिकरित्या सन 1976 मध्ये अधिनियमान्वये महाराष्ट्र पाणी पुरवठा व जलनि:सारण मंडळाची (MWSSB) स्थापना करण्यात आली .MWSSB चे नंतर 1997 मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) असे नाव देण्यात आले.
मजीप्रा ही महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत कार्यरत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे राज्यामध्ये एकूण १९६ कार्यालये आहेत.

प्रबलता

राज्यभर कार्यालये पसरली icon

0

राज्यभर कार्यालये पसरली

एकूण कर्मचारी icon

0

एकूण कर्मचारी

पूर्ण झालेल्या ग्रामीण पाणी पुरवठा योजना icon

0

पूर्ण झालेल्या ग्रामीण पाणी पुरवठा योजना

पूर्ण झालेल्या शहरी पाणी पुरवठा योजना icon

0

+

पूर्ण झालेल्या शहरी पाणी पुरवठा योजना

मजीप्राच्या प्रमुख जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत:

आवश्यक आर्थिक तरतुदींच्या सुविधेसह पाणीपुरवठा आणि मल:निस्सारण योजनांचे नियोजन, रचना आणि अंमलबजावणी करणे.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार, पाणीपुरवठा तसेच मल:निस्सारण योजना संचालन आणि देखभाल करणे.
पाणी पुरवठा आणि मल:निस्सारण ​​क्षेत्रासाठी सेवा स्तर बेंच मार्क स्थापित करणे.
घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनात शासनास तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना मदत करणे.
पाणीपुरवठा व मल:निस्सारण योजनांबाबत, शासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करणे.
वार्षिक कृती आराखडा तयार करण्यासाठी आणि पाणीपुरवठा दर/कर/ उपकर संरचना स्थापन/सुधारण्यासाठी शासनाला पाठिंबा देणे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव हे राज्य शासनाने नियुक्त केलेले पद असून श्री अभिषेक कृष्णा हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव आहेत.

धोरणात्मक बदल

73 व्या आणि 74 व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची भूमिका पुन्हा परिभाषित करण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार प्राप्त झाल्याने त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आपल्या भूमिकेतील बदल आत्मसात करण्यासाठी अंतर्गत पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पुनर्रचना

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या 111 व्या संचालक मंडळाच्या  बैठकीत पुनर्रचनेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली ज्यामध्ये केंद्रीकृत जबाबदाऱ्यांसह कार्यालयांचे पुनर्वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.

देखभाल व दुरूस्ती शी संबंधित कामे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी, प्रगत तंत्रज्ञान समर्थन, शहरी आणि ग्रामीण योजनांची अंमलबजावणी इत्यादी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या दिनांक 03.11.2011 च्या आदेशाद्वारे आणि त्यानंतरच्या इतर आदेशांद्वारे विशेषतः नियुक्त कार्यालयांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले होते.

सामंजस्य करार

जल व्यवस्थापनातील अग्रगण्य संस्था असलेल्या पब्लिक युटिलिटी बोर्ड, सिंगापूर आणि रॅनहिल्स, मलेशिया यांच्यासोबत तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारांमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला विशेषत: गळती शोधणे आणि गैर-महसुली पाणी कमी करण्याच्या क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान आणणे शक्य झाले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासाठी अधीक्षक अभियंता (मुख्यालय) आणि मुख्य अभियंता हे अनुक्रमे मुख्यालय आणि प्रादेशिक विभाग स्तरावर तांत्रिक कामांची कामे पाहतात …..अधिक माहितीसाठी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कामे पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे अमरावती, औरंगाबाद, नागपूर, पुणे, नाशिक आणि कोकण असे सहा प्रादेशिक विभाग आहेत. प्रत्येक प्रादे‍शिक विभागाचे प्रमुख हे मुख्य अभियंता असतात या 6 प्रादे‍शिक विभागांतर्गत खालील कार्यालये कार्यरत आहेत.

अधीक्षक अभियंत्यांच्या नियंत्रणाखाली 14 मंडळ कार्यालये.
कार्यकारी अभियंत्यांच्या नियंत्रणाखाली 37 विभागीय कार्यालये.
143 उपविभाग कार्यालये उपअभियंत्यांच्या नियंत्रणाखाली.
नाशिक येथे प्रशिक्षण केंद्र.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे एकूण 47 वॉटर वर्क्स आहेत. सदर वॉटर वर्क्सचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

प्रादेशिक विभाग वॉटर वर्क्स योजनांची नावे विभाग उपविभागाचे नाव किरकोळ ठोक एकूण
नागपूर वेना पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग नागपूर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन उपविभाग नागपूर 7582 9 7591
महादुला पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग नागपूर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन उपविभाग नागपूर 2445 3 2448
गोंदीया पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग गोंदीया महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग क्र.1 गोंदीया 24130   24130
बल्लारपूर पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चंद्रपूर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग बल्लारपूर 14333 8 14341
तिरोडा पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग गोंदीया महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग क्र.1 गोंदीया 3842   3842
पिंप्री मेघे पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग वर्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग वर्धा 17412   17412
आर्वी पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग वर्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग आर्वी 4982   4982
आहेरी पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चंद्रपूर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग बल्लारपूर 2263 2 2265
गोरेगांव पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग गोंदीया महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग क्र.3 गोंदीया 1687   1687
पेरी अर्बन नागपूर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग नागपूर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग क्र.2 व 4 नागपूर 17599   17599
अमरावती अमरावती पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग नागपूर अमरावती जल व्यवस्थापन उपविभाग क्र.1 98674   98674
अमरावती जल व्यवस्थापन उपविभाग क्र.3
यवतमाळ पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग यवतमाळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उप विभाग यवतमाळ 42503 7 42510
156 गांवे + महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग अमरावती जल व्यवस्थापन उपविभाग दर्यापूर 31283   31283
अंजनगांव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग अमरावती  जल व्यवस्थापन उपविभाग दर्यापूर 9622   9622
अकोट पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग अकोला 12531   12531
करंजा पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग वाशिम 8715   8715
जळगांव जामोद पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग बुलढाणा 3806   3806
चिखलदरा पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग अमरावती अमरावती जल व्यवस्थापन उपविभाग अंजनगांव सुर्जी 909   909
पातूर पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग अकोला 2974   2974
105 RR पाणी पुरवठा योजना अमरावती जल व्यवस्थापन विभाग अमरावती जल व्यवस्थापन उपविभाग अंजनगांव सुर्जी 17986   17986
मालपठार 40 RR पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग यवतमाळ 5239 1 5240
लंघापूर +57 गांव RR पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग अकोला 5738   5738
79 गांवे RR पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग अमरावती अमरावती जल व्यवस्थापन उपविभाग अंजनगांव सुर्जी 12436   12436
मानोरा व 28 गांवे RR पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग वाशिम 3892   3892
दर्यापूर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग अमरावती जल व्यवस्थापन उप विभाग दर्यापुर 9254   9254
कोंकण अंबरनाथ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंबरनाथ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग बदलापूर 35873 16 35889
बदलापूर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंबरनाथ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग बदलापूर 24910 7 24917
न्हावाशेवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पनवेल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग पनवेल   56 56
गोवणे पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पालघर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग वाणगांव   27 27
माथेरान पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पनवेल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग कर्जत 1437   1437
अंबोली पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग सिंधुदूर्ग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग सावंतवाडी 121   121
पुणे सातारा पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग
सातारा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग क्र.1 सातारा 19770 5 19775
महाबळेश्वर पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग
सातारा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग पाचगणी   1 1
पाचगणी पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग सातारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग पाचगणी 2339   2339
चाकण पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग क्र.2 पुणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग क्र.3 पुणे 368   368
जलोची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग क्र.1
पुणे
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग बारामती 9305 1 9306
गांधीनगर ग्रामीण पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग कोल्हापूर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग क्र.6 कोल्हापूर 3159   3159
शिरभावी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग सोलापूर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग सांगोला   103 103
डोंगरगांव कुसगांव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग क्र.2 पुणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग क्र.3 पुणे 2027   2027
तनंग ग्रामीण पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग सांगली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग मिरज 833   833
नाशिक लष्कर पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग नाशिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन उपविभाग क्र.1 नाशिक   3 3
इगतपुरी पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग नाशिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन उपविभाग क्र.1 नाशिक 38 4 42
ओझर साकोरे व 2 गांवे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग नाशिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन उपविभाग क्र.1 नाशिक 0 7 7
चांदवड व 44 गांवे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग नाशिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन उपविभाग क्र.3 नाशिक 84 85 169
दहिवळ व 25 गांवे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग नाशिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन उपविभाग मालेगांव 3963   3963
नायगांव व 9 गांवे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग नाशिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन उपविभाग क्र.3 नाशिक 697 1 698
मालमठा व 25 गांवे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग नाशिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग नाशिक 2522   2522

वित्त संचालक हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वित्त विभागाचे कामे पाहतात …..अधिक माहितीसाठी
मुख्य प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापना विभागाचे कामे पाहतात …..अधिक माहितीसाठी