आस्थापना
आस्थापना
Banner Image Banner Image

परीचय

राज्यातील पाणी पुरवठा कार्यक्रमाचे योजनाबध्द रितीने नियोजन, जलद विकास व उचित संनियंत्रण करण्याच्या दृष्टीने औपचारिकरित्या सन 1976 मध्ये अधिनियमान्वये महाराष्ट्र पाणी पुरवठा व जलनि:सारण मंडळाची (MWSSB) स्थापना करण्यात आली .MWSSB चे नंतर 1997 मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) असे नाव देण्यात आले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिनियम 1976, महाराष्ट्र शासनाने तयार केला असून, विधी मंडळाने त्यास मान्यता दिली आहे. सदर अधिनियमाव्दारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची सांविधानिक प्राधिकरण म्हणून स्थापना झाली.

मजीप्रा ही महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत कार्यरत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे राज्यामध्ये एकूण 196 कार्यालये आहेत.

मजीप्राच्या प्रमुख जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत:

  • आवश्यक आर्थिक तरतुदींच्या सुविधेसह पाणीपुरवठा आणि मल:निस्सारण योजनांचे नियोजन, रचना आणि अंमलबजावणी करणे.
  • महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार, पाणीपुरवठा तसेच मल:निस्सारण योजना संचालन आणि देखभाल करणे.
  • पाणी पुरवठा आणि मल:निस्सारण ​​क्षेत्रासाठी सेवा स्तर बेंच मार्क स्थापित करणे.
  • घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनात शासनास तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना मदत करणे.
  • पाणीपुरवठा व मल:निस्सारण योजनांबाबत, शासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करणे.
  • वार्षिक कृती आराखडा तयार करण्यासाठी आणि पाणीपुरवठा दर/कर/ उपकर संरचना स्थापन/सुधारण्यासाठी शासनाला पाठिंबा देणे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव हे राज्य शासनाने नियुक्त केलेले पद असून माननीय सदस्य सचिव हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रमुख आहेत. सदस्य सचिव यांच्या अधिपथ्याखाली खालील विभाग कार्यरत आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापना विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी हे प्रमुख आहेत

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा आस्थापना विभागा मार्फत प्रामुख्याने आस्थापना विषयी अनुषंगिक बाबी जसे की  ज्येष्ठतासुची अद्ययावत करुन प्रसिध्द करणे, बिंदुनामावल्या अद्ययावत करण्यात करणे,पदोन्नती/नेमणूक करणे, सर्वसाधारण व विनंती बदल्या बदल्याचे प्रस्ताव., विभागीय चौकशी बाबतची प्रकरणे., सेवापुस्तके अद्ययावत करणे, वेतनवाढीचे आदेश निर्गमित करणे, रजा मंजूर करणे, वेतननिश्चिती करणे, नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त करणे, स्वेच्छा सेवानिवृत्ती करणे, कार्यालयीन कार्यभारानुसार नवीन कार्यालयांची निर्मिती करणे/ बंद करणे, न्यायालयीन प्रकरणे हाताळणे, मानिव दिनांकास मंजूरी देणे, पारपत्रासाठी/विदेश प्रवासासाठी ना हरकत प्रमाणपत्र” देणे, स्थायीकरण करणे, परिवीक्षा कालावधी संपुष्टात आणून सेवा नियमित करणे, शाखा अभियंता दर्जा देणे, आश्वासित प्रगती योजना मंजूर करणे, अतिरिक्त कार्यभार सोपविणे, विशेष वेतन मंजूर करणे, मासिक दौरा/दैनंदिनी मंजूर करणे,मजीप्रा मालकीच्या/ ताब्यात असलेल्या मालमत्ता विषयक बाबीची प्रकरणे हाताळणे

मुख्य प्रशासकीय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली आस्थापना अधिकारी- दक्षता, प्रशासकीय नि आस्थापना अधिकारी, कायदा व कामगार अधिकारी आणि व्यवस्थापक तथा उपअभियंता मालमत्ता हे कार्यरत आहेत.

आस्थापना अधिकारी(दक्षता) यांच्या अधिपत्याखाली आस्थापना -2 असून या कार्यासनामार्फत अधिकारी/कर्मचारी यांचे विभागीय चौकशी प्रकरणे हाताळण्यात येत आहे.

कायदा व कामगार अधिकारी यांच्या अधिपत्याखाली आस्थापना-8 या कार्यासनामार्फत म.जी.प्रा.च्या संबंधित न्यायालयीन प्रकरणे  हाताळतात.

व्यवस्थापक तथा उपअभियंता मालमत्ता यांच्या अधिपत्याखालील आस्थापना-9 हे म.जी.प्रा.च्या स्थावर व जंगम मालमता व म.जी.प्रा.च्या निवासस्थानाशी  संदर्भातील प्रकरणे हाताळतात.

प्रशासकीय नि आस्थापना अधिकारी यांच्या अधिपत्याखालील आस्थापना कार्यरत असून यांचेकडे 8 कक्ष अधिकारी विविध आस्थापना विषयक प्रकरणे हाताळत असून  त्यांची कर्तव्य व जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे

आस्थापना-1 (तांत्रिक प्रशासन) : या कार्यासनामार्फत कार्यकारी अभियंता ते मुख्य अभियंता (स्थापत्य) व कार्यकारी अभियंता ते अधीक्षक अभियंता (यांत्रिक) या संवर्गातील ज्येष्ठतासूची व पदोन्नती इत्यादी आस्थापना विशेषक बाबी हाताळण्यात येत आहे.

आस्थापना-1 (उविअ) : या कार्यासनामार्फत उप अभियंता (स्थापत्य/यांत्रिक) या संवर्गातील ज्येष्ठतासूची व पदोन्नती इत्यादी आस्थापना विशेषक बाबी हाताळण्यात येत आहे.

आस्थापना-2 : या कार्यासनामार्फत अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल व प्रशिक्षण विशेषक बाबी हाताळण्यात येत आहे.

आस्थापना-3 : या कार्यासनामार्फत कक्ष अधिकारी, कार्यासन अधिकारी व प्रथम लिपीक तसेच गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठतासूची व पदोन्नती इत्यादी आस्थापना विशेषक बाबी हाताळण्यात येत आहे.

आस्थापना-4 : या कार्यासनामार्फत म.जी.प्रा.च्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करणे, म.जी.प्रा.चा वार्षिक लेखे प्रसिध्द करणे तसेच म.जी.प्रा.च्या आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांचे वैद्यकीय देयकांची प्रतिपुर्तीची कार्यवाही इत्यादी आस्थापना विशेषक बाबी हाताळण्यात येत आहे.

आस्थापना-5 : या कार्यासनामार्फत म.जी.प्रा.च्या आस्थापवनेवरील लेखा व वित्त, उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक या संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांची तसेच म.जी.प्रा.च्या मध्यवर्ती कार्यालयातील गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठतासूची व पदोन्नती इत्यादी आस्थापना विशेषक बाबी हाताळण्यात येत आहे.

आस्थापना-6 : या कार्यासनामार्फत म.जी.प्रा.च्या आस्थापवनेवरील सहाय्यक अभियंता श्रेणी-2 व कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी) या संवर्गातील अभियंत्यांच्या ज्येष्ठतासूची व पदोन्नती इत्यादी आस्थापना विशेषक बाबी हाताळण्यात येत आहे.

आस्थापना-7 : या कार्यासनामार्फत म.जी.प्रा.च्या पाणी पुरवठा केंद्रावरील रोजंदारी कर्मचाऱ्यांना रुपांतरीत अस्थाई व रुपांतरीत स्थाई पदावर घेणेबाबतचे प्रस्ताव तयार करणे व त्यास मा.सदस्य सचिव, यांची मान्यता घेणे इत्यादी बाबी हाताळण्यात येत आहे.