राज्यातील पाणी पुरवठा कार्यक्रमाचे योजनाबध्द रितीने नियोजन, जलद विकास व उचित संनियंत्रण करण्याच्या दृष्टीने औपचारिकरित्या सन 1976 मध्ये अधिनियमान्वये महाराष्ट्र पाणी पुरवठा व जलनि:सारण मंडळाची (MWSSB) स्थापना करण्यात आली .MWSSB चे नंतर 1997 मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) असे नाव देण्यात आले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिनियम 1976, महाराष्ट्र शासनाने तयार केला असून, विधी मंडळाने त्यास मान्यता दिली आहे. सदर अधिनियमाव्दारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची सांविधानिक प्राधिकरण म्हणून स्थापना झाली.
मजीप्रा ही महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत कार्यरत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे राज्यामध्ये एकूण 196 कार्यालये आहेत.
मजीप्राच्या प्रमुख जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत:
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव हे राज्य शासनाने नियुक्त केलेले पद असून माननीय सदस्य सचिव हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रमुख आहेत. सदस्य सचिव यांच्या अधिपथ्याखाली खालील विभाग कार्यरत आहेत.
वित्त विभाग
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वित्त विभागाचे संचालक वित्त हे प्रमुख आहेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा वित्त विभाग हे लेखा अंदाजपत्रक तयार करणे, कर्मचाऱ्यांचे वेतन प्रदान करणे, कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन मंजूर करणे, निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतनप्रदान करणे, कर्मचाऱ्यांचे GPF/NPS चे लेखे सांभाळणे, सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांचे अंतिम प्रदान, मजीप्राच्या अतिरिक्त निधीची गुंतवणूक करणे तसेच वित्तविषयक बाबींवर नियंत्रण ठेवणेइत्यादी जबाबदाऱ्या पार पाडते.
संचालक वित्त यांच्या अंतर्गत दोन उपमुख्य लेखाधिकारी कार्यरत आहेत. उपमुख्य लेखाधिकारी-I हे निवृत्तीवेतन,भविष्य निर्वाह निधी/राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, गुंतवणूक आणि कर्ज पुनर्प्राप्ती आशा सर्वप्रकारचे प्रकरणे हाताळतात. व उपमुख्य लेखाधिकारी-II हे बजेट, निधी व्यवस्थापन, खाती, अंतर्गत ऑडिट आणि रोख संबंधित प्रकरणे हाताळतात.
उपमुख्य लेखाधिकारी यांचेकडे दोन वरिष्ठ लेखाधिकारी, तीन लेखाधिकारी आणि चार सहाय्यक लेखाधिकारी ही पदे असून उपरोक्त जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी वित्त विभागाशी संबंधिताना मदत करतात. लेखापरीक्षण प्रकरणे हाताळण्यासाठी उपमुख्य लेखाधिकारी-II यांना मदत करण्यासाठी एक अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी कार्यरत आहे.
वित्त विभाग खालील जबाबदाऱ्या पार पाडतात.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिनियम 1976 मधील कलम 15 (2) (जी) आणि 34 (1) नुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वार्षिक अंदाजपत्रक तयार केले जाते. अर्थसंकल्प ही अशी प्रक्रिया आहे जिथे पुढील वर्षाच्या खर्चाचे नियोजन केले जाते आणि भविष्यातील खर्चासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाते.
मजीप्रामध्ये अर्थसंकल्पीय तरतूद दरवर्षी (वार्षिक) केली जाते
मजीप्रामध्येअर्थसंकल्पासाठी दोन प्रकारचे दृष्टिकोन वापरले जातात,
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे 2022-23 या आर्थिक वर्षाचे वार्षिक महसूल जमेचेअंदाजपत्रक रु.1032.60 कोटी आणि भांडवली जमेचेअंदाजपत्रक रु.590.41 कोटीअसून ते 13/04/2022 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या 152 व्या बैठकीत मंजूर केले आहे.
निधी व्यवस्थापनही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये संस्था त्यांच्या योजना/कार्यक्रमासाठी त्यांचा निधी परिचालन खर्च, आर्थिक खर्च किंवा इतर कोणत्याही खर्चाप्रमाणे मंजूर करते आणि जारी करते. निधी व्यवस्थापन संस्थेच्या रोख प्रवाहाच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग लेखा पध्दती प वाणिज्यिक लेखा पध्दती यांचा मेळ घालून मध्यवर्जी कार्यालयाच्या स्तरावर लेख्यांचे संकलन केले जाते. क्षेत्रिय कार्यालयात सार्वजनिक विभागाची लेखांकन पध्दती अवलंबिली असून, मध्यवर्ती कार्यालयात वाणिज्यिक लेखांकल पध्दती अवलंबिली आहे.पूर्वीच्या पध्दतीऐवजी पाणीपटटीचे विलंब आकाराची रक्कम व दंडनीय व्याजाची रक्कम हि प्रत्यक्ष प्राप्त झाल्यानुसारच लेख्यांमध्ये नोंदविण्यात आलेली आहे, कारण थकीत रकमेतून प्रत्यक्ष प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाची अनिश्चितता जास्त आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वार्षिक लेखे कंपनी कायद्याच्या शेड्युल 06च्या जवळच्या नमुन्यांमध्ये तयार केले जातात ज्यामध्ये उत्पन्न आणि खर्च खाते आणि ताळेबंद यांचा समावेश होतो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिनियम 1976 च्या कलम 34 (2) नुसार, प्रत्येक आर्थिक वर्षासाठीकार्यक्रम बाब व आवश्यक टिप्पणीसह प्राधिकरणाचे वार्षिक लेखे तयार केले जातात आणि संचालक मंडळाकडे त्याच्या मंजुरीसाठी सादर केले जातात. संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर, प्राधिकरणाचे वार्षिक लेखे महालेखापाल कार्यालय यांचेकडे लेखापरीक्षणाकरीता सादर केले जातात.
अंतर्गत लेखापरीक्षण हा विभाग मजीप्राच्या कार्यकारीअभियंता/विभागीय कार्यालय, अधीक्षककार्यालय, मुख्यअभियंताकार्यालय आणि पाणी पूरवठा केंद्रांचे अंतर्गत लेखापरीक्षणकरण्याची जबाबदारी पार पाडतात. त्यानुसार अभिलेखांच्या पडताळणीसाठी लेखापरीक्षण कार्यक्रम तयार केला जातो. अभिलेखांच्या पडताळणीसाठी अंतर्गत लेखापरीक्षण पथके अधीनस्थ कार्यालयांना भेट देतात.
हा विभाग महालेखापालकार्यालयाकडीलप्रलंबितपरीच्छेद आणि अनुपालनेसंकलित करतो आणि ते महालेखापालकार्यालयात सादर करतो.हा विभाग दरवर्षी मजीप्रामध्ये महालेखापालकार्यालयाचा लेखापरीक्षण कार्यक्रम आयोजित करतो. या व्यतिरिक्तयाविभागामार्फतकर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांची पडताळणी करणे, महालेखापालकार्यालयाकडील अहवालांचे अनुपालन, मजीप्राच्या कार्यालयांचे लेखापरीक्षण कार्यक्रम तयार करणे, लेखापरीक्षण अहवालानूसार कामांची प्रगती, डेड स्टॉक पडताळणी करणे, ही कामे केली जातात.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांसाठी, मध्यवर्ती कार्यालयाचा निवृत्तीवेतन विभाग महालेखापालकार्यालय आणि कोषागार कार्यालय म्हणून काम पहातो. सेवा पुस्तक पडताळणीनंतर, निवृत्तीवेतन विभाग निवृत्तीवेतन प्रदान आदेशनिर्गमित करून कर्मचार्याचेनिवृत्तीवेतनप्रदान मंजूर करतो आणि दरमहानिवृत्तीवेतनप्रदानदेखील जारी करतो. सध्या निवृत्तीवेतनप्रदान विभाग दरमहा सुमारे 11000 निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनप्रदान करत आहे. तसेच उपदानाचे प्रदान, 80/85 वर्षांनंतर निवृत्तीवेतन पुर्नस्थापित करणे ही कामे या विभागाद्वारे केली जातात.
वित्त विभागाच्या दिनांक 27/10/2015 आणि 13/03/2020 च्या शासन निर्णयांनुसार दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अतिरिक्त निधीची गुंतवणूक हि गुंतवणूक निधी वाढवण्यासाठी केली जाते.
अल्पकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी निर्णय घेण्याच्या उद्देशाने, G.R. दिनांक-6-8-2002 नुसार दोन स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यानुसार समितीच्या मान्यतेनुसार अल्पकालीन व दीर्घकालीन गुंतवणूक केली जाते.
या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, MJP कडे उपलब्ध असलेली कोणतीही तात्पुरती अतिरिक्त रक्कम अल्प मुदतीच्या ठेवींमध्ये ठेवली जाते.
आवश्यकतेनुसार घसारा निधी, निवृत्तीवेतन निधी, कर्जनिवारण निधी इत्यादी रकमा दिर्घ मुदतीच्या 03 वर्षांच्या ठेवीत गुंतवला जातो.
मध्यवर्तीकार्यालयातीलभ.नि.नि.विभाग मजीप्राच्या कर्मचाऱ्यांची भविष्यनिर्वाहनिधीआणि राष्ट्रीयनिवृत्तीवेतनयोजनांचेलेखेठेवतो. भविष्यनिर्वाहनिधीचे अंतिम प्रदान आणि अग्रिमाचे आदेश या विभागाद्वारे मंजूर केले जातात.
ही वेबसाइट महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाची आहे
अंतिम पुनरावलोकन तारीख 13/04/2023
कॉपीराइट © महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.
सेंटम टेक्नॉलॉजीज द्वारा समर्थित