राज्यातील पाणी पुरवठा कार्यक्रमाचे योजनाबध्द रितीने नियोजन, जलद विकास व उचित संनियंत्रण करण्याच्या दृष्टीने औपचारिकरित्या सन 1976 मध्ये अधिनियमान्वये महाराष्ट्र पाणी पुरवठा व जलनि:सारण मंडळाची (MWSSB) स्थापना करण्यात आली .MWSSB चे नंतर 1997 मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) असे नाव देण्यात आले.
मजीप्रा ही महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत कार्यरत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे राज्यामध्ये एकूण 196 कार्यालये आहेत.
मजीप्राच्या प्रमुख जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत:
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव हे राज्य शासनाने नियुक्त केलेले पद असून माननीय सदस्य सचिव हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रमुख आहेत. सदस्य सचिव यांच्या अधिपथ्याखाली खालील विभाग कार्यरत आहेत.
तांत्रिक विभाग
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तांत्रिक विभागाचे सदस्य सचिव हे प्रमुख आहेत.
तांत्रिक विभागाच्या मध्यवर्ती कार्यालयच्या अतंर्गत अधीक्षक अभियंता (मुख्यालय), अधीक्षक अभियंता (मध्यवर्ती नियोजन संकल्प चित्र व सनियंत्रण), अधीक्षक अभियंता (यांत्रिकी), अधीक्षक अभियंता (गुणवत्ता परिक्षण पथक) आणि संचालक (मीत्रा) ही यंत्रणा कार्यरत आहेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता हे मुख्यालय प्रमुख आहेत. त्यांचे अतंर्गत 4 तांत्रिक अभियंते , 1 कार्यकारी अभियंता (मु) व उप अभियंता आयटी सेल, हे कार्यरत असून हे खालील जबाबदाऱ्या पार पाडतात.
सदस्य सचिव कार्यालय येथे कार्यरत असलेले तांत्रिक विभागातील ताशा-1- अमरावती व औरंगाबाद प्रादेशिक विभागातील सर्व प्रकरणे, परिपत्रके व धोरणात्मक बाबी, जल जीवन मिशन EPC निविदा प्रस्ताव, मीत्रा पत्रव्यवहार, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सेवा प्रकरणे (PMC) हाताळतात.
ताशा-2- हे नाशिक प्रादेशिक विभागातील सर्व प्रकरणे, पाणी टंचाई संबंधित सनियंत्रण, जल जीवन मशिन कार्यक्रम तांत्रिक उप समिती कार्यवाही, यांत्रिकी दरसूची, जल जीवन मिशन जनरल ही प्रकरणे हाताळतात.
ताशा-3- पुणे व ठाणे प्रादेशिक विभागातील सर्व प्रकरणे , विधिमंडळ कामकाज सनियंत्रण, नाबार्ड अर्थ सहाय्यीत योजना सनियंत्रण, स्थापत्य दरसूची याबाबत कार्यवाही करतात.
ताशा-4- नागपूर प्रादेशिक विभागातील सर्व प्रकरणे, निविदा समितीचे आयोजन, घनकचरा व्यवस्थापन दरसूची तसेच पत्रव्यवहार, दरसूची मध्ये (यांत्रिकी / स्थापत्य) नव्याने समाविष्ट करावयाच्या बाबींचा प्रस्ताव, तांत्रिक सर्वसाधारण बोर्ड मिटींग पत्रव्यवहार इत्यादी कामे सांभाळतात.
कार्यकारी अभियंता (मु) यांचे अंतर्गत डीआय,एच डी पी ई, पी व्ही सी पाईप, यांचा पुरवठा करण्यासाठी अंतिम रेट कॉर्न्ट्रक्ट करून विविध योजनासाठी पाईप पुरवठा करणे, कंत्राटदार तसेच विक्रेता नोंदणी करणे इत्यादी कामाबाबत कार्यवाही केली जाते.
उप अभियंता आयटी सेल अंतर्गत ई-गव्हर्नन्स उपक्रमांतर्गत डिजिटल प्लॅटफॉर्मचा विकास आणि अंमलबजावणी करणे, माहिती, दळणवळण आणि तंत्रज्ञान (ICT) लागू करून प्रशासकीय प्रक्रियेचे बळकटीकरण करणे तसेच पाणी पुरवठा आणि मल:निस्सारण योजनांच्या संबंधित सॉफ्टवेअरची खरेदी करणे याबाबतची सर्व कार्यवाही केली जाते.
अधीक्षक अभियंता (मनिसंस) हे खालील जबाबदाऱ्या पार पाडतात.
अधीक्षक अभियंता (गुणवत्ता परिक्षण पथक) हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविल्या जाणाऱ्या सर्व ग्रामीण तसेच नागरी योजनांच्या कामांचे टप्पानिहाय नियमित गुणवत्ता तांत्रिक परीक्षण करणे,मां. मंत्री महोदय , मा.प्रधान सचिव , मा. लोक आयुक्त तसेच मा. सदस्य सचीव म.जी.प्रा. यांनी निर्देशित केल्यानुसार तक्रारींच्या अनुषंगाने योजनांच्या कामांची प्राधान्याने तपासणी करणे व त्यांचा तपासणी अहवाल सादर करणे ,राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम , तसेच शासनाच्या विविध कार्यक्रमांतर्गत स्थानिक संस्थांद्वारे ( जिल्हा परिषद / ग्राम पंचायत ) राबविण्यात येणाऱ्या पाणी पूरवठा व स्वच्छतेसंबंधी योजनांचे किमतीनिहाय सशुल्क त्रयस्थ यंत्रणा तपासणी करणे व शासनाच्या विविध कार्यक्रम /अभियानांतर्गत नागरी स्थानिक संस्थांद्वारे राबविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा तसेच भुयारी गटार योजनांचे मागणीनुसार सशुल्क त्रयस्थ तांत्रिक परीक्षण करणे इत्यादी कामे करतात.
अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) यांचे अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनासाठी लागणाऱ्या यांत्रिकी बाबींचे जसे की पंप, व्हॉल्व्ह इत्यादीचा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांची नोंदणी करणे, सर्व कार्यालयाकडून येणाऱ्या सर्व प्रस्तावाची छाननी करून मंजूरी देणे, यांत्रिकी दरसूची अद्ययावत करणे इत्यादी कामे केली जातात.
अधीक्षक अभियंता तथा संचालक (मीत्रा) यांचे अंतर्गत नाशिक येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासाठीचे प्रशिक्षण केंद्र असून मजीप्राच्या अधिकारी / कर्मचारी यांचे साठी आवश्यक त्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाची आखणी करून त्यांची अंमलबजावणी केली जाते.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कामे पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे अमरावती, औरंगाबाद, नागपूर, पुणे, नाशिक आणि कोकण असे सहा प्रादेशिक विभाग आहेत. प्रत्येक प्रादेशिक विभागाचे प्रमुख हे मुख्य अभियंता असतात तर मंडळ, विभाग आणि उपविभाग हे त्यांच्या अखत्यारित असतात. परिमंडळाचे अधीक्षक अभियंता, विभागाचे कार्यकारी अभियंता आणि उपविभागासाठी उपअभियंता हे प्रमुख असतात. सदर कार्यालयातंर्गत खालील कामे केली जातात.
स्थापत्यसाठी प्रादेशिक विभाग निहाय दरसूची प्रसिद्ध करणे, पाणी पुरवठा तसेच मल:निस्सारण योजनाचे प्रकल्प तयार करून मंजूरी मिळाल्यानंतर त्यांची अंमलबजावणी करणे व स्थानिक स्वराज्य संस्थेला हस्तांतरीत करणे, स्थानिक स्वराज्य संस्थेकडून प्राप्त तांत्रिक प्रस्तावांना मंजूरी देणे, योजनेशी निगडीत प्रस्ताव जसे की मुदतवाढ, तांत्रिक बदल प्रस्ताव, जादा परिमाणांचा प्रस्ताव, अतिरिक बाबीचा प्रस्ताव तयार करून त्यास मंजूरी घेणे इत्यादी कामे हाताळली जातात.
ही वेबसाइट महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाची आहे
अंतिम पुनरावलोकन तारीख 13/04/2023
कॉपीराइट © महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.
सेंटम टेक्नॉलॉजीज द्वारा समर्थित