कंत्राटदार नोंदणी फॉर्म
कंत्राटदार नोंदणी फॉर्म
Mobile Banner Image Mobile Banner Image

कंत्राटदार नोंदणी फॉर्म

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) कडून दरवर्षी पाणीपुरवठा व स्वच्छता क्षेत्रातील कामे मोठ्या प्रमाणावर केली जातात. सदर कामाकरीता यापुर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) केंद्र/ राज्य/ मुंबईमहापालिका/ म.रा.वि.म./ म.औ.वि.म, इ आस्थापनेकडे नोंदणीकृत कंत्राटदाराकडून निविदा मागवित असत. कंत्राटदार व त्यांच्या कार्यपद्धती बाबत मजीप्राची स्वतंत्र नियमावली नव्हती.

पाणीपुरवठा व स्वच्छता क्षेत्रातील वैशिष्टपुर्ण कामाच्या अनुषंगाने मजीप्रास कामाच्या दृष्टीने नवीन नियमावली तयार करण्याची आवश्यकता भासली. त्यानुसार कंत्राटदारासाठी मजीप्राने नवीन नियमावली तयार करून त्यास मजीप्राच्या संचालक मंडळाच्या दि. २२ एप्रिल १९९२ रोजीच्या ५७ व्या बैठकीत मान्यता घेतली होती. तसेच सदर नियमावलीच्या तिसऱ्या आवृतीस मजीप्राच्या संचालक मंडळाच्या दि. १५ सप्टेंबर १९९८ रोजीच्या ८१ व्या बैठकीत मान्यता दिलेली आहे.

मा. सदस्य सचिव,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) यांना या नियमावली बाबतचे अंतिम अधिकार देण्यात आलेले आहेत.